Breaking

100 Days Program : अकोल्याचे मृद व जलसंधारण कार्यालय राज्यात प्रथम

Akola’s Soil and Water Conservation Office is the first in the state : १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेतील कामगिरीची दखल

Akola महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा’ मोहिमेत अकोल्याच्या मृद व जलसंधारण कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांच्या नेतृत्वाखाली विभागाने विविध नवकल्पनांचा प्रभावी वापर करत कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला.

प्रमुख सुधारणा व उपक्रम :

डिजिटल उपस्थिती : विभागाचे संकेतस्थळ swcdakola.in अद्ययावत करून तक्रार निवारण, योजना व संपर्क सुविधा उपलब्ध.
ई-ऑफिस प्रणाली : कागदविरहित कामकाजामुळे फाईल हालचाली वेगवान व पारदर्शक.
ऑनलाइन सेवा : सर्व अधिसूचित सेवा व प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध.
हजेरी व अभिलेख व्यवस्थापन : आधुनिक हजेरीपट प्रणाली व डिजिटल रेकॉर्ड रूमची अंमलबजावणी.
AI चा वापर : एमकेसीएलमार्फत प्रशिक्षण घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फाईल ट्रॅकिंग व निर्णय प्रक्रियेत.
वाटरशेड मॉडेल : गावपातळीवरील पाणलोट संकल्पना समजण्यासाठी प्रत्यक्ष मॉडेलची निर्मिती.
स्वच्छता व हरित उपक्रम : प्लास्टिकमुक्त परिसर, हरित भिंती, झाडांची लागवड व कचरा व्यवस्थापन.

MLA Nitin Deshmukh : घरकुल योजनेतून विधवांना डावलले?

या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार व प्रादेशिक अधिकारी दिलीप निपाणे यांचे मार्गदर्शन लाभले. “या यशामुळे आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव झाली आहे. कार्यक्षम आणि लोकाभिमुख सेवा सुरू ठेवू,” असे जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी सांगितले.