Breaking

100 Days Program : लोकांसोबत सौजन्याने वागा!

Treat common citizens well : सचिवांचा प्रशासनाला सल्ला; विभागांनी तक्रारी शून्य कराव्यात

Wardha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. सात कलमी कृती आराखडा दिला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करा. नागरिकांसोबत सौजन्याने वागा. त्यांच्या तक्रारी शुन्य करा, अशी सल्लावजा सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव तथा वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यादव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

अद्ययावत संकेतस्थळ निर्माण करणे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे. त्यांचे प्रश्न व समस्या स्थानिक पातळीवर सोडविणे. योजनांचा लाभ विनाविलंब देणे व सौजन्यपूर्ण वागणूक देणे आपले कर्तव्य आहे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. ‘शंभर दिवस कार्यक्रम’ अंमलबजावणी आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.

Ladki Bahin Yojna : ४० बहिणींकडे कार आहे, तरीही झाल्या ‘लाडक्या’!

बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपवन संरक्षक हरविंर सिंग, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी रवैय्या डोंगरे आदी उपस्थित होते.

शंभर दिवस कार्यक्रम राबवित असताना जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे. सेवाग्राम विकास आराखड्यास गती देणे. जिल्हा नियोजनचा निधी कालमर्यादेत खर्च करणे. नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविणे. आदींना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश पालक सचिव यांनी दिले. कार्यालयात पिण्याचे स्वच्छ पाणी, प्रसाधनगृह, प्रतीक्षा कक्ष आदी सुविधा असाव्यात असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाने आपले अद्ययावत संकेतस्थळ निर्माण करावे. या संकेतस्थळावर सेवा हमी कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व त्यासाठी लागणारा कालावधी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. हे संकेतस्थळ आपले सरकार पोर्टल व पीजी पोर्टलला संलग्न करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

PWD issued notice : माजी नगरसेवकाचा सरकारी जागेवर डल्ला!

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची नागरिकांना माहिती देण्यासोबतविनाविलंब लाभ देण्यासाठी सुलभ कार्यपद्धती विकसित करावी असे ते म्हणाले. कार्यलय प्रमुखांनी क्षेत्रीय भेट द्याव्यात व या भेटीत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शाळांना भेटी देऊन पाहणी करावी. जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग, खवडा पॉवर ट्रान्समीशन, सिंदी ड्रायपोर्ट व विस्तारीत समृध्दी महामार्ग या सारख्या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या कामांना गती द्यावी, असंही ते म्हणाले.