Harshvardhan Sapkal welcomes Yajnavalkya Jichkar back to Congress : निलंबनाची कारवाई घेतली मागे, हर्षवर्धन सपकाळ यांनी केले स्वागत
Mumbai : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (१७ एप्रील) काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेऊन त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला.
आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धनंजय शिंदे यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत केले. याच्ज्ञवल्क्य जिचकार आणि धनंजय शिंदे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला पूर् विदर्भात चांगली बळकटी मिळेल, असे मत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केले.
Harshawardhan Sapkal : राज्य टिकवण्यासाठी दंगली, पण आपला मार्ग सद्भावनेचा !
महाबळेश्वरमध्ये शिबिर..
राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन ते विसरले. आता फक्त ५०० रुपयेच दिले जात आहेत. महायुतीने केवळ मतांसाठी योजना आणली होती. महायुती लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, हे काँग्रेसने आधीच सांगितले होते. प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुर्नरचना लवकरच केली जाईल आणि महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार आहे, अशी माहितीही प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
Harshawardhan Sapkal : जिझिया कराच्या आड भाजपकडून जनतेची लूट!
काँग्रेस खासदार व ज्येष्ठ नेत्यांची बैठक..
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. त्यानंतर दुपारी २ वाजता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. संवाद, समन्वय रणनिती यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.