Rehabilitation of villages surrounded by forests : पुनर्वसनासाठी पुढाकार; गरमसूरचा विषय निकाली
Wardha काही गावं कित्येक दशकांपासून जंगलांमध्ये आहेत. अनेक वर्ष कधी जंगलांमध्ये राहण्याचा त्रास या गावांना आणि गावकऱ्यांना झाला नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये वन्यजीव व मानवातील संघर्ष वाढला आहे. अनेक दुर्दैवी घटनाही घडत आहेत. अशात जंगलांनी वेढलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे.
अशाच कठीण परिस्थितीत जगत असलेल्या गरमसूर व अन्य चार गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला. गरमसूरमधील नागरिकांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार रामदास तडस, सेलू तालुका भाजपाचे अध्यक्ष अशोक कलोडे, सरपंच अर्चना राऊत, वर्धा पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
Local Body Elections : मंडळ अध्यक्ष नव्हे, निवडणुका जिंकण्याची सोय!
वर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला बोर टायगर रिजर्व देशातील एक छोटा टायगर रिजर्व असून मागील काही वर्षांत रिजर्वमध्ये वन्यप्राण्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रिजर्व क्षेत्र देखील वाढविण्यात आले. परंतु क्षेत्रात असलेल्या गावांचा पुनर्वसनाचा विषय निर्माण झाला होता. क्षेत्रात काही गांवे येत असल्याने या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरत होती.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रिजर्व क्षेत्रातील नवरगांवचे पुनर्वसन केल्याने गरमसूरसह येनीदोडका, मेट हिरजी, उमरविहिरी, मरकसूर या गावांनी देखील पुनर्वसनाची मागणी रेटून धरली. या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. राज्य वन्यजीव मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
या बैठकीत गरमसूरसह अन्य चार गावांचे पुनर्वसनास मान्यता देण्यात आली. गावाच्या पुनर्वसनाचा विषय मागी लावल्याबद्दल बोर व्याघ्र प्रकल्प बाधित पुनर्वसन संघर्ष समितीने पालकमंत्र्यांचा सत्कार केला. याप्रसंगी रामदास तडस यांनी गरमसूर वासियांची मागणी १० वर्षांनी पूर्ण झाल्याचे सांगितले. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या कार्यतत्परतेमुळे हा विषय मार्गी लागला, असे मत माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.