Breaking

Buldhana MLA Sanjay Gaikwad : बीडमध्ये 1222, तर बुलढाण्यात 942 बंदुक!

बुलढाणा

ShindeSena compared Buldhana with Beed : शिवसेनेच्या आमदारांनी केली बुलढाण्याची तुलना बिडसोबत

शिंदेसेनेचे Shinde Shivsena बुलढाणा येथील आमदार संजय गाडकवाड वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी बीड Beed येथील गुन्हेगारीची तुलना बुलढाण्यासोबत केली. बीडमध्ये जास्त बंदुकी Revolver असून, तेथे यंत्रणांचे नियंत्रण नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. तेथील परिस्थिती यंत्रणांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोबतच बुलढाण्यात Buldhana 942 बंदुकींचे परवाने आहेत, तर बीडमध्ये 1222 बंदुकींचे परवाने आहेत, अशी आकडेवारी सांगत त्यांनी बुलढाण्याची तुलना बीडसोबत केली.

विशेष म्हणजे, आमदार गायवाड हे स्वत: सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी यंत्रणांबाबत दाखविलेल्या अविश्वासामुळे राज्यातील सरकारचेही नियंत्रण सुटले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी विकासकामांची तसेच शहराच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगत त्यांनी बीड जिल्ह्यातील घडामोडीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उपरोक्त उत्तर दिले.

अधिकारीच गायब झाला होता

मस्साजोग येथील सरंपच संदोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांनी बिडमधील गुन्हेगारीचा आलेख कसा वाढला आहे, याची आकडेवीरी सादर केली. बीडमध्ये तर 1992 दरम्यान एका नेत्याच्या घरी गेलेला अधिकारी गायब झाल्याचा दावा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्याची सध्या चर्चा होत आहे. सोबतच त्यांनी मस्साजोग प्रकरणाच्या संदर्भाने विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली असल्याचेही स्पष्ट केले.

कायम वादात राहणारा नेता

आमदार संजय गायकवाड कायम चर्चेत राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. कधी आपल्या कृतीतून तर कधी वादग्रस्त विधानांमधून ते कायम चर्चेत असतात. यापूर्वी मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून ते चर्चेत आले होते. त्यांनी एकदा वाघाच्या शिकारीचा दावाही केला होता. तर निवडणुकीपूर्वी एक पोलीस कर्मचारी त्यांची कार धुताना आढळला होता. राहुल गांधी यांच्यावर टीका करूनही त्यांनी रोष ओढवून घेतला होता.