Devendra Fadanvis : उबाठाला देशातील जनता माफ करणार नाही !

 

Devendra Fadnavis’ criticism on Uddhav Thackeray said The people of India will not forgive : देशावरील संकटकाळात सर्व राजकीय पक्ष कायमच सोबत

Mumbai : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला हा देशावरील हल्ला आहे. यापूर्वी देशावर जेव्हा – जेव्हा शत्रुंचा हल्ला झाला, संकट आले, तेव्हा – तेव्हा सर्वच राजकीय पक्ष कायम सोबत राहिलेले आहेत. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठींबा दिला होता. पण पहलगामवरील हल्ल्यानंतर उबाठाने जे कोते मन दाखवले, त्याला या देशातील जनता कदापिही माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पहलगाममध्ये अडकलेले, आतापर्यंत परतलेले पर्यटक आणि परतीच्या प्रवासात असलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांना माहिती देत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी लहान – लहान पक्षांनाही निमंत्रित केले होते. सर्व जण आलेसुद्धा. पण उबाठा पक्षाकडून कुणीही आले नाही. संकट संपूर्ण देशावर आले असताना असे वागणे योग्य नाही. देशातील जनता ही गोष्ट कधीही विसरणार नाही.

CM Devendra Fadnavis: अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम होणार

कार्यवाही युद्धस्तरावर..
महाराष्ट्रात किती पाकिस्ताना नागरीक आहेत, त्यांची यादी तयार झाली आहे. त्यांना परत पाठवण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू आहे. पाकिस्तानी नागरीक ४८ तासांच्या वर महाराष्ट्रात राहता कामा नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. असे कुणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Devendra Fadnavis : शाळांमध्ये स्मार्ट फोनचा वापर नकोच!

८०० पर्यटक परतले..
काश्मीरात अडकलेल्या आपल्या लोकांना परत आणण्याचीही कार्यवाही युद्धस्तरावर सुरू आहे. आपली तीन विमाने मिळून ४१६ पर्यटक परत आले. तर अन्य माध्यमांतून आतापर्यंत एकूण ८०० पर्यंटक परत आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. याशिवाय ६० ते ७० पर्यटकांनी विनंती केली आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे केली जात आहे, असेही ते म्हणाले.