Vijay Vadettiwar targeted both Devendra Fadnavis and Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद, सर्वत्र सावळागोंधळ
Nagpur : सरकारमध्ये सध्या सर्वत्र गोंधळलेली स्थिती आहे. सरकारमधील एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा, सुव्यवस्था आणि हिंदुत्व शिकवतो आणि त्याला त्याच मतदारसंघातील स्थानिक मंत्री असलेले ‘आम्हाला शिकवू नका..’ , असे उत्तर देतात. काही महाभाग तर गृहमंत्री आमचेच आहेत, असेही बोलतात. त्यामुळे या सरकारमध्ये सगळा सावळागोंधळ आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (२८ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की १०७ पाकिस्तानी बेपत्ता आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की पाकिस्तानचा महाराष्ट्रातील एकही नागरीक बेपत्ता नाही. यावरून त्यांच्या – त्यांच्यातच समन्वयाचा किती अभाव आहे, हे दिसून येते. या सरकारमध्ये विसंवाद आहे, हे आता लपून राहिलेले नाही. सरकार गोंधळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kashmir terrorist attack : दहशतवाद्यांच्या घरांवर चालतोय बुलडोजर !
मुगलांच्या इतिहासाबाबत विचारले असता, इतिहासात जे घडलं, तो ठेवा आपण जपत असतो. इतिहास घडलेल्या घटनांची साक्ष देत असतो. पण दोन धर्मांत दंगली घडतील, अशा प्रकारचा नव्या अभ्यासक्रमात समावेश करणे आणि मूळ इतिहास संपवणे, हे म्हणजे धर्मांधतेचा पुरस्कार करण्याचा प्रकार आहे. मूळ इतिहास पुसून नवा इतिहास लिहीण्याची ताकद असेल तर त्यांनी दाखवावी, असे वडेट्टीवार म्हणाले.
Kashmir terrorist attack : आज सायंकाळपर्यंत एकूण एक पाकिस्तानी परत जाणार !
शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. ईडीसह स्पेशल एसआयटी नेमली पाहिजे. हा घोटाळा मोठा आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. जे संस्थाचालक दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. शिक्षण विभागाची जी यंत्रणा दोषी आहे, त्यातील एकालाही सोडू नये. पण ज्यांनी घोटाळे केले, त्यांना वाचवण्यासठी निरपराध माणसांचा बळी घेऊ नये, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.