Supriya Sule questions whether there is a backup of the files burnt in the fire : पहिल्या १५ मिनीटांत आगीवर नियंत्रण का मिळवता आले नाही ?
Mumbai : ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ती आग लागली की लावण्यात आली, येथपासून या प्रकरणाच सुरूवात होते. या आगीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवर पहिल्या पंधरा मिनीटांत नियंत्रण मिळवण्यात अपयश का आलं? त्या इमारतीमध्ये अग्नीशमन यंत्रणा नव्हती का? त्या परिसरात वर्दळ नाही, खुली जागा आहे. असं असताना आग विझवण्यासाठी वेळ का लागला? कागदपत्र जळाल्याचा दावा केला जात आहे. ज्या फाईल्स जळाल्या त्याचे बॅकअप आहे का, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत. बॅकअप नसेल तर ही धक्कादायक बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
महायुतीच्या राज्यातील मंत्री नहररी झिरवळ यांनी त्यांचा जाहिरनामा कदाचित वाचला नसावा. जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. त्याची प्रत मी स्वतः झिरवळ यांना पाठवून देईल, असे खासदार सुळे नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाल्या.
Congress Satyagraha : उद्या परळीत काॅंग्रेसचा संकल्प सत्याग्रह !
केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ठरवलं होतं की, पुढील काही दिवस ज्यामुळे देशात कटुता वाढेल आणि देशातील एकतेला धक्का बसेल, अशी वक्तव्य करायची नाहीत. आणि जवळपास नेत्यांनी हो गोष्ट पाळली. मिडियानेसुद्धा देशवासीयांच्या वेदना वाढवणारे फोटो आणि व्डिडिओज प्रसारीत केले नाहीत, ही चांगली गोष्ट झाली असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Supriya Sule : डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालयाला वाचवणारा अहवाल जाळून टाका !
सोमवारी मुंबई रुळावर आली होती..
काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेऊन काम करण्याची गरज आहे. सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे दहशतवादाला न घाबरता काम केले पाहिजे. मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला होता आणि सोमवारी मुंबई रुळावर आली होती. त्याचप्रमाणे काश्मीरमधील परिस्थितीही लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.