Breaking

Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !

 

Chandrashekhar Bawankule Said Like leaders, officials should also declare assets : भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

Nagpur : महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जमाबंदी कार्यालयात लाच घेतल्याचे आरोप आहेत. त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही. राजकीय नेत्यांप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर केली पाहिजे, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बड्या अधिकाऱ्यांची चौकशी आणि बडतर्फी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

पुरंदर विमानतळाच्या बाबतीत महसूल मंत्री म्हणाले की, भुसंपादन प्रक्रियेमध्ये काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लाठीचार्ज झाला आणि काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज मान्य नाही. त्यामुळे गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊ आणि हा प्रश्न सोडवू.

Congress Leader : पहिले देशातच पप्पू म्हणायचे, आता देशाबाहेरही पप्पू म्हणतात !

सद्यस्थितीत ‘वन डिस्ट्रीक – वन रज्सिट्रेशन’ सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे. हा महाराष्ट्राच्या नोंदणी प्रक्रियेतील मोठा बदल आहे. ही योजना अमलात आल्यापासून नागरिकांना जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील लोकांना ही योजना दिलासा देणार ठरणार आहे.

Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेच्या बैठकीत खोटे ठराव?

जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कादपत्रांचा त्रास वाचणार आहे. यापुढे वन स्टेट – वन रज्सिट्रेशन ही संकल्पनाही लवकरच अंमलात आणली जाणार आहे. त्यानंतर कुठल्याही जिल्ह्यातील नोंदणी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातून करता येणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.