Breaking

Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !

Karkar couple joins Shiv Sena, another setback for Uddhav Thackeray : औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्याला नवसंजीवनी

Mumbai : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष बळकटीसाठी दमदार पावले टाकणे सुरू केले आहे. शिवसेनेमध्ये इनकमींग चांगलेच वाढले आहे. आज माजी नगरसेवक हर्षद कारकर यांनी पत्नी दिक्षा यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला.

हर्षद कारकर हे मुंबई महानगरपालिका विधी समितीचे अध्यक्ष राहून चुकलेले आहेत. २०१७ ते २०२२ या काळात उबाठाचे नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी दिक्षा कारकर युवा सेनेच्या कार्यकारी सदस्य आणि महिला आघाडीच्या उपविभाग संघटक आहेत. या दोघांच्याही नेतृत्वात आजी माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shiv Sena – NCP : काका – पुतण्या आणि दोघे भाऊ एक झाले तर स्वागतच !

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्याला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे लोकांचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे म्हणत कारकार दाम्पत्य शिवसेनेमध्ये आले आहेत.

India – Pakistan War : महाराष्ट्रात मॉकड्रिल, ब्लॅकआऊट संदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश !

आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे मुंबईत शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होईल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !