Muslims survived in India because of the Constitution : आमदार पठाण म्हणाले, ‘हा देश आमचा असल्याचा अभिमान आहे’
Akola “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आज भारतात मुस्लिम समाजाचे अस्तित्व टिकून आहे. ‘हा देश आमचाही आहे’ हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो,” असे प्रतिपादन आमदार साजिदखान पठाण यांनी केले. खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
“आंबेडकरांच्या तत्त्वांचा प्रसार आणि अंमल या प्रतिष्ठानमार्फत सातत्याने केला जातो. मुस्लिम समाजासाठीही ही संस्था आदर्श ठरत आहे,” असे गौरवोद्गारही पठाण यांनी यावेळी काढले.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रा. गणेश बोरकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. मुकुंद भारसाकळे होते.
CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा
आपल्या अध्यक्षीय भाषणात भारसाकळे म्हणाले, “समाजाचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधायचा असेल, तर समाजाने संघटित राहणे आवश्यक आहे. प्रतिष्ठान भविष्यात बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी कार्यरत राहील. धम्मप्रसारकांना उचित मानधन देण्याचा मानस असून, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मविचारांची अंमलबजावणी हीच आमची दिशा आहे.”
India – Pakistan War : भारताने पाकिस्तानची चांगलीच जिरवली, आता पुरावे येत आहेत समोर !
“शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडवण्यासाठी धम्मदानदात्यांनी पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, प्राचार्य हिमेश बाबू नानलवाल हेही कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन वंदना तायडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन रमेश तायडे यांनी मानले.