Instructions to provide facilities on the occasion of Hajj pilgrimage : हज हाऊसची अवस्था बघून अध्यक्षांना धक्का; दुरुस्तीचे आदेश
Nagpur नागपूर हज हाऊसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शौचालयांपासून ते पायऱ्यांपर्यंत सर्व काही तुटलेले आहे. वर्षानुवर्षे स्वच्छता केलेली नाही. पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नाही. एक लिफ्टदेखील बंद आहे. ही एकूणच परिस्थिती बघून राज्य समितीच्या अध्यक्षांना धक्काच बसला. त्यांनी पाहणी केल्यानंतर तातडीने सर्व सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्याची व दुरुस्ती करण्याची सूचना दिली.
हज हाऊसची पाहणी करण्यासाठी मंत्रालयातून राज्य हज समितीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी नागपूरला आले. राज्य हज समितीचे अध्यक्ष आसिफ खान आणि वरिष्ठ अधिकारी मोहम्मद झुबैर यांनी नागपूर जिल्हा हज खिदमतगार समितीचे अधिकारी आणि कामगारांसह हज हाऊसमधील दुर्दशेची व सुविधांचीही पाहणी केली. हज यात्रेला काही दिवस शिल्लक असताना हज हाऊसची ही अवस्था असणे दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त होत होती.
Nagpur Municipal Corporation : रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणार का?
१५ मे रोजी विभागीय आयुक्तांनी हज हाऊसमधील सुविधांबाबत एक महत्त्वाची बैठकही बोलावली आहे. यामध्ये व्यवस्थांचाही आढावा घेतला जाईल. हज यात्रेकरूंचे पहिले विमान २३ मे रोजी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सौदी अरबकडे रवाना होईल. त्यासाठी २१ मेपासूनच हज यात्रेकरूंचे जत्थे नागपूरच्या हज हाऊसला पाेहोचतील. कारण २१ पासूनच हज यात्रेसाठी रिपाेर्टिंग करावे लागणार आहे.
Amravati BJP : भाजपने केले अमरावतीचे तीन भाग; तीन अध्यक्ष दिले!
यावेळीदेखील नागपूर, विदर्भासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील हज यात्रेकरू नागपूरच्या इंबार्केशन पाॅइंटवरून रवाना होतील. या सर्व हज यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्थाही हज हाऊसमध्ये केली जाईल. काही दिवसांपूर्वी, नागपूर हज हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावरील छत कोसळले. तेव्हा तिथे कोणीच नव्हते, अन्यथा काही नुकसान झाले असते. पण छप्पर कोसळून जवळजवळ एक महिना झाला आहे, परंतु समितीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. समिती निद्राधिन हाेती.