Love marriage ends in a year, incident in Yavatmal : अल्पवयीन विद्यार्थ्यांना भावनिक करून काढला पतीचा काटा
Yavatmal : 13 मे ची मध्यरात्र पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला. पत्नीला शिवीगाळ केली. पण पती होशमध्ये नाही असे समजून त्याही स्थितीत पत्नीने त्याला बनाना शेक बनवून दिला. पण हे पत्नीचे प्रेम नव्हते, तर पतीच्या अनन्वीत छळापासून त्रासलेल्या पत्नीने घेतलेला प्रतिशोध होता. बनाना शेक प्यायल्यानंतर काही वेळातच पतीचा तडफडून मृत्यू झाला. एखाद्या चित्रपट किंवा टीव्ही मालिकेचा हा प्रसंग असावा, असं वाटतं. पण ही घटना यवतमाळ शहरात प्रत्यक्षात घडली आहे.
वर्षभरापूर्वी शंतनू देशमुख व निधी देशमुख यांचे एकमेकांवर प्रेम जडले. आंधळ्या प्रेमात दोघांनीही घरच्यांचा विरोध झुगारून लग्न गेले. पण व्यसनाधिन झालेला शंतनू रोज निधीला शिवीगाळ, मारहाण करायचा. शेवटी तिने शिकवणीला येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना भावनिक साद घालून शंतनूला विष देऊन ठार मारले. वर्षभरात या प्रेमाचा तडफडून अंत झाला.
Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या नेत्यांनी बांधले अजित पवारांचे घड्याळ!
शंतनू देशमुख (३२) हा रोज दारू पिऊन निधीचा (२३) अनन्वीत छळ करायचा. प्रेमविवाह केल्यानंतर नशीबी असा पती आल्याने निधी हतबल झाली होती. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न गेल्यामुळे माहेरही तुटले होते. अशात ही एकटी पडली होती. पण दररोजचा अत्याचार असह्य झाला होता. शेवटी तिने शंतनुला संपवायचे ठरवले. यासाठी तिच्याकडे शिकवणीसाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांची तिने मदत घेतली. आणि १३ मेच्या रात्री त्याला विषारी बनाना शेक देऊन त्याला ठार मारले. त्यानंतर अल्पवयीन तीन विद्यार्थ्यांना भावनिक केले आणि त्यांच्याकडून मृतदेहाची विल्हेवाट लाऊन घेतली.
MLA Sajid Khan Pathan : नेते म्हणाले, महावितरणचीच वीज खंडीत करणार!
अत्यंत थंड डोक्याने निधीने शंतनुला संपवले. यासाठी तिने गुगलवरून विष तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेतली. विष तयार करण्यासाठी तिने धोतऱ्याचे फुलं, फळ आणि पॅरासीटॉमॉलच्या टॅबलेट वापरून बनाना शेक बनवला. शंतून प्रचंड दारु पिऊन आला असतानाही त्याला अत्यंत प्रेमाने शेक पाजला. काही वेळातच शंतनू तडफडून मरण पावला. तो मेल्याची खात्री केल्यानंतर तिने तीन विद्यार्थ्यांना बोलावले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली. शंतनू विद्यार्थ्यांसमोरही निधीला मारहाण करायचा. त्यामुळे तो क्रूर आहे, हे विद्यार्थ्यांनाही माहिती होते. त्यामुळे त्यांनीही आपल्या मॅडमची मदत केली आणि शंतनूचा मृतदेह यवतमाळ – किटाकापरा रोडवरील चौसाळा परिसरात नेऊन टाकला.
Eknath Shinde Shiv Sena : माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, जबाबदारीही मिळाली!
दुसऱ्या दिवशी निधीने पुन्हा तिघांना तेथे पाठवले आणि मृतदेह जाळून टाकायला सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे मृतदेह जाळला. पण काही पुरावे पूर्णपणे जळू शकले नाहीत. शंतनुच्या शर्टचे काही तुकडे तेथे होते. घटनेच्या रात्री ज्या मित्रांसोबत शंतनू दारू प्याला होता, तेव्हा मित्रांनी त्याचा व्हिडिओ बनवला होता. तो पोलिसांच्या हाती लागला. त्या व्हिडिओतील शर्ट आणि घटनास्थळावर मिळालेले कपड्याचे तुकडे एकच होते. यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर निधी व तिच्या भावाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला. चूक नसताना आपला भाऊ अडकेल या भीतीने निधीने या कोल्ड ब्लडेड मर्डरची कबुली दिली.
Amravati NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जंबो’ कार्यकारिणी जाहीर
शंतनुला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न..
शंतनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याचा मोबाईल निधीकडेच होता. ती त्याच्या मित्रांशी व्हॉट्सअॅपवरून संवाद साधायची. यातून शंतनू जिवंत आहे, असे ती भासवत होती. पण हे करताना ती त्याच्या मित्रांना ‘भैय्या’ असे संबोधायची अन् शंतनू मित्रांशी चॅटींग करताना ‘भाऊ’ असे लिहायचा. यावरून त्याच्या मित्रांनाही संशय आला. ही बाब त्यांनी पोलिसांना सांगितली. हासुद्धा निधीच्या विरोधात पुरावा ठरला आणि तिचं बिंग फुटले.
पोलिसांनी निधीला अटक केली. तिन्हे गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता तिला २२ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. एका प्रेमाचा अशा गुन्हेगारी कृत्याने तडफडून अंत झाल्याने समाजमन हळहळले आहे.