Breaking

Santosh Deshmukh murder case : वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, बडतर्फ पीएसआयचा दावा !

dismissed PSI claims Valmik Karad was given VIP treatment in jail : पोलिस प्रशासनात एकच खळबळ

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा बीडच्या जेलमध्ये आहे. जेलमध्येही वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले हा शनिवारी (ता. २४) तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्याने वाल्मिक कराडला तुरुंगात सर्व सोयी – सुविधा दिल्या जात असल्याचा दावा केला आहे.

फरसान, तेल लावलेल्या चपात्या, बुधवारी आणि रविवारी चिकन देत वाल्मिक कराडची तुरुंगात जोरदार बडदास्त ठेवली जात असल्याचा दावा, कासलेने केला आहे. त्याच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी वाल्मिक जिल्हा रुग्णालयात असताना तेथेही त्याची बडदास्त ठेवली जात होती. त्या प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईसुद्धा झाली होती. आता बीड तुरुंगातही त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bogus school ID case : वैशाली जामदार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी !

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जनतेतून दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपीेंना अटक केली. वाल्मिक कराड यालाही त्याच काळात अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Rural Maharashtra : पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना आजही गाठावा लागतो लांबचा पल्ला !

जिवाला धोका..
बीड कारागृहात वाल्मिक कराडच्या जिवाला धोका आहे, असेही कासले याने व्हिडिओत म्हटले आहे. यासंदर्भात करुणा मुंडे, तृप्ती देसाई, अंजली दमानिया यांना विनंती केल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याला पुणे किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवले पाहिजे, असेही कासलेने म्हटले आहे.