Breaking

Expansion of sports facilities : ऑलिम्पिक विजेते घडवण्याचे ध्येय! मुनगंटीवारांची ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’कडे ठाम वाटचाल

Aiming for Olympic Glory: Mungantiwar’s Resolute March Towards ‘Mission Olympics 2036’ : चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा सुविधांचा केला भव्य विस्तार

Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ हे दूरदृष्टीचे स्वप्न आहे. या मिशनसाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांचा भव्य विस्तार केला आहे. केवळ जिल्ह्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक २०३६ मध्ये सहभागी व्हावे, इतक्यावर त्यांचे समाधान नाही, तर त्यांनी पदकांची कमाई करून चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडानकाशावर अजरामर करावे, ही त्यांची भूमिका आहे.या उद्दिष्टासाठी गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने कार्यरत असून, अलीकडेच आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिरांमधून ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’कडे त्यांची दमदार वाटचाल सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील युवक – युवतींना शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक दृट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बल्लारपूर येथे १ मे पासून उन्हाळी शिबीर सुरू झाले होते. या शिबिरात १५ खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. समाजभान आणि मूल्यांच्या संस्कारांची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. हा समर कॅम्प तरुणांना सुपरफिट ठेवणारा प्रभावी उपक्रम आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार या शिबिराच्या समारोपप्रसंगी म्हणाले. स्वर्गीय डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन

सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. समीर केने, काशी सिंग, मुन्ना ठाकुर, राजू दारी, संदीप पुणे, सुनील यादव, प्रशांत झांबरे, रोहित तुक्कर यांचाही यामध्ये सहभाग होता. समारोपप्रसंगी आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा आणि चंद्रपूर येथे युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील वातानुकुलीत बॅडमिंटन कोर्ट, बल्लारपुरमधील कॉलरी गेट मैदान, वन अकादमी आणि सैनिकी शाळेतील सुविधा प्रेरणादायी ठरत आहेत.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांकडून मदतीचा हात अन् सुरेखा शिंदे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या!

स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये उभारले जात असलेले २५ खेळ प्रकारांचे अत्याधुनिक स्टेडिअम ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ च्या दिशेने भक्कम पाऊल ठरेल. विसापूर क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धांना देशभरातील २८ राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले. समर कॅम्पच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आमदार मुनगंटीवार यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Sand beach : लाभार्थ्यांचे नुकसान करू नका, आमदार मुनगंटीवार यांच्या सूचना

गरजू मुलींसाठी एसएनडीटी विद्यापीठ व स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमधून अनेक मुलींना स्वबळावर उभं राहण्याची संधी मिळत आहे. विसापूर येथे आर्चरी सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. युवक युवतींनी या क्रीडा व प्रशिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले.