Sudhir Mungantiwar congratulates Chandrapur BJP District President : मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण
Chandrapur भाजपने चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. त्यांच्या नावाची पुन्हा एकदा या पदासाठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरीश शर्मांची नियुक्ती ही बल्लारपूर मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.
एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय या तत्त्वांवर कार्य करण्यावर भाजपचा विश्वास आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदासाठी हरीश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. हरिश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी पक्ष संघटनेने भक्कम कामगिरी केली आहे. त्यांची कार्यक्षमता, संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क यामुळेच त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे.
Nagpur Municipal Corporation : नागरिकांचे महापालिकेच्या मुख्यालयातच आंदोलन
या पुनर्नियुक्तीबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हरिश शर्मा यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल. पक्षाचे विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.