After former MLA’s resignation, Congress’ second line becomes active : संघटनात्मक हालचालींना वेग; स्थानिक निवडणुका कुणाच्या नेतृत्वात?
Khamgao : खामगाव विधानसभेचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांच्या पक्षत्यागानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून दुसऱ्या फळीतील युवा व कार्यक्षम नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत मिळू लागले असून, नव्या नेतृत्व उभारणीसाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत.
नव्या नियुक्त्यांची शक्यता
खामगाव तालुकाध्यक्षपदी काँग्रेस सेवा दलाचे तेजेंद्रसिंह चौहान यांची, तर शेगाव तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेजोळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच, युवानेते स्वप्नील ठाकरे यांनाही मुंबईत पाचारण करण्यात आले असून, त्यांच्याकडेही पक्ष महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Dilip Sananda resigns : अखेर दिलीप सानंदा यांचा राजीनामा, काँग्रेसला धक्का!
सत्तासमीकरणे नव्याने मांडली जात आहेत
राणांच्या एक्झिटमुळे काँग्रेसमधील जुने वर्चस्व संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत असली, तरी दुसरीकडे दबलेल्या नेतृत्वाला पुढे येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः युवा नेतृत्वासाठी हे संधीचं एक नवदालन असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सानंदा यांच्या राजीनाम्याने पक्षात एकाच वेळी शोक आणि संधी अशा दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.
संपर्क मोहिमेला वेग
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खामगाव दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केली असून, गटबाजी बाजूला ठेवून एकसंघ नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडे झुकलेले माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर यांच्याशीही पक्ष नेत्यांनी संवाद साधला असून, बुधवारी काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचे समजते.
Jalindar supekar news: जालिंदर सुपेकरांवर 550 कोटींची लाच मागितल्याचा तक्रारी
निवडणूक पूर्व रणनितीचा भाग
या सर्व घडामोडी आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाच्या नव्या सत्तासमीकरणाचे हे संकेत असून, खामगाव-शेगाव भागात राजकीय समीकरणे नव्याने रचली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.