AI Policy for Agricultural Development in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय, अनिवासी भारतीयांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार
mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले. यात राज्यात शेतीसाठी ए आय धोरणास मंजुरी देण्यात आली. सोबतच धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र असे 10 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या बैठकीत महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री – एआय धोरण 2025 ते 2029 मंजूर करण्यात आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि क्षेत्रात परिवर्तन घडविता येणार आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन मंजूर केली आहे. यामुळेवआदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार आहे.
Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला
एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प आहे. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे. मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार असून हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
School entrance : शाळा प्रवेशोत्सवाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एस पी व्ही, विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती मिळून योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प राहणार आहे.
Local Body Elections : मतदान झाल्यावर उघडली का झोप?, भाजप नेत्यांचा सवाल
महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणामुळे कृषि क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता ‘ बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ‘ या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Eknath shinde : जनता घरात बसणाऱ्यांच्या नाही, काम करणाऱ्यांच्या पाठिशी
अनिवासी भारतीयांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार आहे. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.