25 former corporators of Kolhapur join Shiv Sena : कोल्हापूर मनपातील 25 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत
Mumbai: कोल्हापूर महानगरपालिकेतील 25 माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे असंख्य पदाधिकाऱ्यांन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी, सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे प्रमुख नगरसेवक शिवसेनेमध्ये आले आहेत ही आनंदाची बाब आहे. पाच आमदारांच्या रूपाने येथील जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले. गेल्या अडीच वर्षात विविध विकासकामांसाठी आम्ही 4 हजार 200 कोटी रुपयांचा निधी या शहराला दिला. त्यातून शहरात अनेक विकासकामे घडली.
पुराच्या काळात मी कोल्हापूरात मदतीसाठी आलो होतो मात्र आपल्याला आता या शहराला पुराच्या विळख्यातून कायमचे सोडवायचे आहे. आता पुन्हा एकदा कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पालिकेवर भगवा फडकवाय चा असून त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.यात कोल्हापूर मनपामधील तीन माजी महापौरांचाही समावेश आहे. या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीने शड्डू ठोकला आहे.
Mahayuti Government : अजितदादांच्या खात्यावर आता शिंदेंच्या मंत्र्यांचा ‘वॉच’
शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेशावेळी कोल्हापूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी महापौर सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी सभापती अभिजित चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर, माजी नगरसेविका रीना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, गीता गुरव, अनुराधा खेडेकर अर्चना राजू पागर, सीमा कदम, कविता माने, सुनंदा मोहिते,संगीता सावंत, प्रकाश नाईकनवरे, जहांगीर पंडत, भरत लोखंडे, आनंद खेडकर, इस्माईक बागवान आणि त्यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम
त्यासोबत काँग्रेस पक्षातील अभिजित खतकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा सचिव कुलदीप सावरतकर, संजय सावंत,पार्थ मुंडे, अशोक इंगळे, सुजल चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी आरोग्य आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार किशोर अप्पा पाटील,माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख उदय सावंत, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यासोबतच पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात बंडू माने, सचिन मिस्त्री, अमोल मिस्त्री, किशोर सुतार, दंगल भोई, राकेश सुतार, शाळीग्राम सुतार, प्रवीण सुतार आणि त्यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
___