Breaking

Harshvardhan Sapkal : विकृतीचा कळस लोणीकर, अन्यथा… पळता भुई थोडी करू – सपकाळ

Congress state president warns Lonikars, criticizes Modi :!योजना जनतेच्या पैशातूनच पण मोदी पैसे देतात हा भ्रम

Mumbai : शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्य विकृतीचा कळस आहे. भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची मुजोरी सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. बळीराजाला शिवीगाळ करून त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित्त करावे नाही तर पळता भुई थोडी करू. असा इशारा देत पोशिंद्याचा बाप काढणारा लोणीकर कोण? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच सगळ्या योजना या जनतेच्या पैशावर सुरू असून नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपचा भ्रम आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.°°

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आले आहे. एक भाषा, एक धर्म, एक नेता हा त्यांचा हट्ट आहे, आणि आम्हीच सर्वकाही आहोत हा दर्शवण्याचा प्रकार आहे. जनतेच्या मतातून सरकार स्थापन होते जनतेच्या पैशातूनच योजना राबिवल्या जातात. सरकार शेतकऱ्यांना मदत देते म्हणजे उपकार करत नाहीत. नरेंद्र मोदीच सर्व देतात हा लोणीकर सारख्याचा भ्रम आहे. शेतकऱ्याचा बाप काढणे हा संतापजनक प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनेही आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणून अपमान केला होता.

Conflict on Hindi language compulsion : हिंदी सक्तीला विरोध! मराठी माणसांचा ५ जुलैला भव्य मोर्चा

 

शक्तीपीठ महामार्ग बद्दल बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गाचा घाट दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्यावर घालत आहेत. लाडक्या उद्योगपतींला त्यांचा कच्चा माल विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून गोव्यातील बंदरापर्यंत कॉरिडोर आवश्यक आहे, त्यांच्यासाठी रेड कारपेट अंथरले जात आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास पैसा नाही, ठेकेदाराला देण्यास पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटींची तरतूद मात्र करण्यात आली. हा खर्च १.५ लाख कोटी पर्यंत जाईल त्यातून मलिदा खाण्यासाठी हे सुरु आहे. महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाण्याची ही सुरुवात आहे. भाजपा सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्यासाठी नाही तर मुठभर उद्योगपतींसाठी आहे.

Devendra fadnavis : लोणीकर तुम्ही चुकलेच, मुजोर वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी फटकारले!

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीच्या विरोधात काही संघटना काम करत आहेत, सरकार विरोधात आंदोलन करण्याचा त्यांनी प्रस्तावही दिला आहे. मराठी भाषेसाठी जी आंदोलने, मोर्चे काढले जातील त्यात काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा विषय केवळ पक्षाचा नसून महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा व संस्कृतीचा आहे.

____