Breaking

Jayashri Shelke : बुलढाणा विधानसभेतील निवडणूक वैधतेवर वाद!

Election petition against MLA Sanjay Gaikwad : जयश्री शेळके यांची याचिका, कायदेशीर तरतुदींच्या निकषांची पूर्तता नाही

Buldhana बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड यांच्या निवडीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी गायकवाड निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ जुलैला सुनावणी निश्चित केली आहे.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी याचिका फेटाळण्यासाठी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डर ७ रुल ११ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम ८६(६) अंतर्गत अर्ज दाखल केला आहे.
गायकवाड यांचे वकील ॲड. मोहित खजांची यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, जयश्री शेळके यांची याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१(३) आणि अन्य कायदेशीर तरतुदींच्या निकषांची पूर्तता करत नाही. त्यामुळे ही याचिका सुरुवातीच्या टप्प्यावरच बाद करावी, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Uday Samant : हिंदी भाषा सक्तीचे धोरण, उद्धव ठाकरे यांच्याच काळात

दुसरीकडे, जयश्री शेळके यांच्या वतीने ॲड. आकाश मून यांनी बाजू मांडताना निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम वापरासंबंधी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही, असा दावा केला. तसेच, ईव्हीएम वापरण्याआधीचे निकष आणि वैधता तपासणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला.

Harshvardhan Sapkal : विकृतीचा कळस लोणीकर, अन्यथा… पळता भुई थोडी करू – सपकाळ

हा खटला आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. आता याचिकेवरील पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.