Akola-Pandharpur special train to leave on July 5 : दक्षिण-मध्य रेल्वेतर्फे ५ जुलैला सुटेल अकोला-पंढरपूर गाडी
Akola अकोल्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने ५ जुलै रोजी अकोला-पंढरपूर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ही गाडी २ किंवा ३ जुलैलाही सोडावी, अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली असून, त्यांनी यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरएम तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही संपर्क साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी विविध क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने उपयुक्त निर्णय घेतले जात आहेत. पंढरपूर वारीसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची परंपराही त्यांच्या नेतृत्वात सुरू झाली आहे. नागपूर, अमरावती, खामगाव आणि अकोल्यातून अशा गाड्या सुटत असून, आता अकोल्यातूनही वारकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही पंढरपूरसाठी अकोल्यातून २७० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Sanjay Shirsat : शिरसाट म्हणतात, माझ्या विभागाने निधी दिला, पण कौतुक बावनकुळे यांचे
विशेष ट्रेनचा तपशील असा:
गाडी क्रमांक 07505 – अकोला–मिरज विशेष
५ जुलै रोजी (शनिवार) सकाळी ११ वाजता अकोल्यातून सुटणार.
७ जुलै रोजी (रविवार) सकाळी मिरजला पोहोचणार.
Hindi Marathi Conspiracy : मनसेकडूनही जय्यत तयारी, लोकलमधून सुरू केला प्रचार !
गाडी क्रमांक 07506 – मिरज–अकोला विशेष
६ जुलै रोजी (रविवार) दुपारी २:१४ वाजता मिरजहून सुटणार.
७ जुलै रोजी (सोमवार) संध्याकाळी ४:५० वाजता अकोल्याला पोहोचणार.
ही गाडी अकोला, वाशी, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर, उदगीर, भालकी, बेदर, झहीराबाद, हरूनाबाद, विक्राबाद, तांदूळ, श्रीराम, चित्रपूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुरडवाडी मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.