148 encroachments in Shivangaon removed : विमानतळ नूतणीकरणाचे टेक-ऑफ!

Take-off of Nagpur Airport renovation : शिवणगावातील १४८ अतिक्रमणे काढली

Nagpur विमानतळ विस्ताराच्या कार्याला गती आली आहे. महिनाभराच्या आत जीएमआरला कंपनीला जमीन देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. या अंतर्गत शिवणगाव परिसरातील अतिक्रमण १४८ अतिक्रमणे आतापर्यंत काढण्यात आली आहेत. येत्या १० दिवसांत उर्वरित ६० अतिक्रमणेही काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून शिवणगाव आणि परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारीदेखील ही कारवाई झाली. यामध्ये परिसरातील गोठे, घरे हटविण्यात आली. एकीकडे विमानतळाच्या विस्तारासाठी जीएमआरला जमीन सोपविणे आवश्यक असल्याने कारवाई सुरू आहे.

Mumbai Municipal Corporation : श्रीमंत महापालिकेचा ७४, ४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प!

दुसरीकडे या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्त उघड्यावर पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी गावठाणात भूखंड देण्यात आले आहे. बांधकामाचा मोबदलाही देण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भारतीय वायू सेनेला ४०० हेक्टर जमिनीची आवश्यकता होती.

यापैकी ३८५ हेक्टर यापूर्वीच देण्यात आली. उर्वरित १५ हेक्टर जमीनही लवकरच देण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमानतळाच्या नूतणीकरणाच्या कामाला आता वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्याची फसवणूक; आरोपीही काँग्रेसचेच

विमानतळाचा विस्तार झाल्यास येथून विमानांची ये-जा वाढणार आहे. उड्डाणे वाढल्यास प्रवाशांना विमानसप्रवासासाठी द्यावे लागणारे भाडे कमी द्यावे लागेल, अशी अपेक्षा आहे. तसेच येथून हवाई मार्गाने मालवाहतूक वाढणार आहे. अशात विमानतळाचा विस्तार आवश्यक असतानाच प्रकल्पग्रस्तांवर कुठलाही अन्याय न होता सुवर्णमध्य साधण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.