Shinde groups allegations against Thackeray brothers in the backdrop of Vijay Mela : विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूवर शिंदे गटाचे आरोप
Mumbai : महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड कधी संपला जाणार नाही हे ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी सूचित केलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी ठाकरे ब्रँडवरून टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. त्यांचा टिके मुळे राजकीय चर्चांना उधान आले असून संजय राऊत यांनी त्यांच्या टीकेला उडवून लावले आहे.
राज्यात हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी महायुती सरकारला दोन्ही अध्यादेश रद्द करावे लागल्या नंतर 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रात उत्सुकता असून शिवसेना आणि मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू मराठीवरून कोणता संदेश देणार तसेच भविष्यात एकत्र येणार का? याची सुद्धा चर्चा देशाच्या राजकारणामध्ये आहे. उद्याचा मेळावा उत्सुकता वाढवणारा आहे.
नीलम गोऱ्हे यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे ब्रँडवरून टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की लोकशाहीमध्ये मेळावे घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज्य सरकारने जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि तसेच समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती काय करणार हे विचारात न घेता विरोध करून चुकीच असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटलं. मराठी जणांना लक्षात घेऊन मेळावा होत आहे. असं मी गृहीत धरते असे त्या म्हणाल्या.
Rane vs Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा; हा तर जुहूचा निब्बर!
ब्रँड हा बाजारातील उत्पादनाला वापरतो, काही प्रश्नांची उत्तरं काळ देईल असंही त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभेमध्ये साठ आमदार निवडून आणून शिंदे साहेबांनी आपली प्रतिमा उंचावली. काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही असं म्हणणारे आहेत. मात्र ठाम भूमिकेने त्यांच्यासाठी संघर्ष करावा. काही फुटकळ लोकांची दखल घेतली पाहिजे हे काही गरजेच नसल्याचे म्हणत त्यांनी संदेश देशपांडे यांच्यावर खोचक टीका केली.
Farmer suicide : शेतकरी आत्महत्येचे थैमान, 3 महिन्यात 767 बळीराजांने मरणाला कवटाळले
दरम्यान मराठीवर बोलताना त्या म्हणाल्या की, मराठीने देशाचे नेतृत्व केलं आहे. दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये मराठी व्यावसायिकांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चाला भाजपकडूनच रसद पुरवण्यात आली. अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. या टीकेवर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की मीरा भाईंदरमध्ये रसद पुरवण्याचे काम कोण करत आहे आधी पहिले पाहिजे. राजकारण आपल्या भल्याचं नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.