Jai Gujarat! slogan becomes new topic of discussion : मराठीसाठीच्या वादात जय गुजरात! चा नारा नवीन चर्चेचा विषय
Pune : राज्यात हिंदीला विरोध आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे म्हटले. त्यानंतर त्यांना काहीतरी आठवले त्यांनी पुन्हा माईक जवळ येऊन ‘जय गुजरात’, असे म्हटले. शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मराठीसाठीच्या वादात जय गुजरात! चा नारा नवीन चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटर मधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे दर वेळेप्रमाणे विस्तृत कौतुक केले. अमित शाह यांचे कौतूक करताना शिंदे यांनी अनेक विशेषणं आणि उपमांचा उल्लेख केला. मात्र, या सगळ्यात भाषणाच्या शेवटी. शिंदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या वेळी त्यांनी हा नारा दिला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्य पण व्यक्त केले गेले.
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Mangal Prabhat Lodha : मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झाला आहे. या कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणे झाली. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहां यांनी आपल्या भाषणात थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची महती कथन केली. अमित शाह कार्यक्रमाचे आकर्षण होते मात्र कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे हेच चर्चेचा विषय ठरले.