Breaking

Sushil kedia : राज ठाकरे यांना भिडणाऱ्या सुशील केडिया यांचं ऑफिस फोडले !

In run-up of Marathi melava, coconuts thrown and the office broken ; मराठी मेळाव्याच्या धावपळीत, नारळ फेकून फोडले कार्यालय

Mumbai : एकीकडे मराठी मेळाव्याची धावपळ सुरू असताना
मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना भिडणाऱ्या सुशील केडिया यांचं ऑफिस फोडण्यात आलं आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिलं होतं. त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली. शिवाय’ काय करायचं आहे!’ ते कर असे आव्हान दिलं.
सुशील केडिया यांचं ऑफिस नारळ फेकून फोडण्यात आलं आहे. माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केडियाचं ऑफिस फोडल्याची माहिती मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. आज आम्ही केडियाचं ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही घाबरणार नाही. केडियाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही गोळे यांनी दिला आहे.

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले

मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील 30 वर्ष महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कायदा तयार केला पाहिजे,नाहीतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेत, असं गोळे यांनी स्पष्ट केले.

 

Swami Anand Swaroop : ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा;

सुशील केडीया हे एक गुंतवणूकदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत आपला व्यावसाय करतात. त्यांनी मराठीबाबत एक ट्वीट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे, त्यात ते म्हणतात की ,’ आय डोन्ट लव्ह मराठी, आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल!’ त्यांनी या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘ मी 30 वर्ष मुंबईत राहतो. पण मला मराठी निट समजत नाही. मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर!’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.