Congress MLA from West Nagpur Vikas Thackeray exposed the scam : लोकांचं नुकसान होणार नाही, हे तपासून अधिकाऱ्यांनी काम करावं
Nagpur : म्हाडाचे मुंबई आणि नागपूरमधील अधिकारी फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या अवलंबतात. या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत नियमांची ऐसीतैसी करत लेआऊट व इमारतीच्या नकाशाला मंजुरी दिली आणि बिल्डरला या योजनेच्या अनुदानाचा फायदा मिळवून दिला. या प्रकाराची तक्रार पश्चिन नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. आता हे काम तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजना प्राधिकरण मुंबई यांनी १ जुलै २०२५ रोजी वास्तुविशारद आलोक लुनिया यांना सदर बांधकाम थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. यापूर्वी १० जून २०२५ रोजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार विकास ठाकरे यांच्या तक्रारीवर बैठक झाली होती. त्यांनी चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिले होते.
District Bank Election : वडेट्टीवार-धानोरकर कालपर्यंत भांडले, आता बँकेतील सत्तेसाठी एकत्र!
आमदार ठाकरे यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी डॉ. भोयर यांना यासंदर्भात बैठक घ्यायला सांगितल होते. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आता जवळपास सिद्ध झाले आहे. नागपूरच्या मिलेनियम डेव्हलपर्स अॅंड प्रमोटर्स प्रा. लि. या कंपनीने वानाडोंगरी येथील जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मल्टी स्टोरी फ्लॅट्स आणि व्हिला बांधण्याचे काम सुरू केले आहे. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची तक्रार विकास ठाकरे यांनी केली.
Chandrashekhar Bawankule : देशात अराजकता पसरवण्याची मानसिकता योग्य नाही !
अनेक लोकांनी आयुष्यभराच्या बचतीतून या योजनेतील फ्लॅट्स खरेदी केले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण विभागाने संपूर्ण योजनेचा तातडीने ताबा घ्यावा आणि संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांसह बिल्डरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.