Those who attacked Praveen Gaikwad are not from BJP, action must be taken : प्रवीण गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे
Nagpur : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. पण या प्रकरणी भाजपचा कुठलाही संबंध नाही. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, तो आरोपीच आहे. आरोप करणाऱ्यांची तोंडं बांधून ठेऊ शकत नाही. सुषमा अंधारेंना ही सामान्य गोष्ट माहिती असायला पाहिजे की, मंत्री, नेत्यांसोबत सगळेच जण फोटो काढतात. त्यांना नाही म्हणता येत नाही, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यासंदर्भात आज (१४ जुलै) नागपुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. तो भाजपचा कार्यकर्ता आहे. पण तरीही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारचे हल्ले या राज्यात खपवून घेतले जाणार नाहीत. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. असे खालच्या पातळीवरचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही.
Crime News : ड्रगसह 18.17 लाखाचे साहित्य जप्त, राजकीय वर्तुळात खळबळ
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकार देत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांवर समाधानकार उत्तरे दिली आहे. याही आठवड्यामध्ये जे काही प्रश्न मांडले जातील, त्याचीही उत्तरे आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ. महाराष्ट्राच्या सभागृहात काम करणाऱ्या विरोधकांनी विधायक कामे करावी. आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही बावनकुळे म्हणाले.
Devendra Fadnavis : काही लोक एकही अक्षर न वाचता, जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत!
ठाकरे अॅव्हेलेबल नसतात..
उद्धव ठाकरेंना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, पक्ष सांभाळता येत नाही. भेटायला वेळ नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. नेता अॅव्हेलेबल नसला तर कार्यकर्ता कुणाकडे जाणार? कार्यकर्ते कुठेतरी जातीलच. त्यामुळे ते भाजपमध्ये येत आहेत. आमचे नेते पूर्ण वेळ अॅव्हेलेबल आहेत. १३७ आमदार उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत.