Former commissioner questioned, political allegations : माजी आयुक्तांची 18 तास चौकशी, राजकीय आरोपांमुळे वातावरण तापले
mumbai : वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय
ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 18 तासांची चौकशी पार पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी अनिलकुमार पवार यांची सखोल चौकशी केली. त्यांच्याकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज व हार्ड डिस्कमधील मोठा डेटा जप्त करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईत अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर थेट प्रतिक्रिया देत, माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याचा दावा केला. त्यांनी याच मुद्द्यावरून दादा भुसेंवर थेट आरोप करत म्हटले की, पवार यांची नियुक्ती ही भुसेंच्या शिफारशीनुसार झाली होती. या आरोपांनंतर दादा भुसे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्वीकारले की, होय, पवार हे माझे नातेवाईक आहेत. माझ्या बहिणीची कन्या त्यांच्या कुटुंबात दिलेली आहे. मात्र, ते माझ्या राजकारणात येण्याच्या अगोदरपासून सेवेत आहेत. विविध ठिकाणी त्यांनी नोकरी केली आहे.
Ladki Bahin Yojna: ‘ लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभ परत घेण्याची मागणी !
भुसेंनी पुढे स्पष्ट केले की, वसई-विरार महानगरपालिकेत आयुक्तपदावर पवार यांची नियुक्ती ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती. त्यामुळे या नेमणुकीशी माझा काहीही संबंध नाही. राऊत यांनी अभ्यास न करता आरोप केले आहेत. दादा भुसे यांनी राऊतांवर टीका करत म्हटले की, ते नेहमीप्रमाणे पोपटपंची करतात. पूर्वीही त्यांनी माझ्यावर साखर कारखान्यावरून खोटे आरोप केले होते. त्यावर मी दावा दाखल केला होता. आता त्या प्रकरणातून सुटका मिळवण्यासाठी हे नवे आरोप करत आहेत. राजकारणात मतभेद असू शकतात, पण खोटे आरोप हे अप्रामाणिक राजकारण आहे.
District Bank Notice Case : जिल्हा बँकेच्या नोटीस प्रकरणावर ६ ऑगस्टला सुनावणी
नेमणूक आणि नातेवाईक प्रकरणावरून सुरू असलेला वाद
पवार यांची शिफारस आपणच केली होती का, याबाबत विचारले असता भुसे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र, त्यांनी उलट टोला लगावत म्हटले की, राऊतांनी जर एवढं काही केलं असेल, तर मग पवार यांची नियुक्ती त्यांनीच केली असं मीही म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट ‘नातेवाईक आहे’ म्हणून दोषारोप करणे योग्य नाही. माझे हजारो नातेवाईक आहेत, सगळीकडे मीच कारणीभूत आहे का? या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, ईडी कारवाईच्या मागे राजकीय हेतू, सत्तासंबंध, शिफारशी व अधिकारवापर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीकडून पुढील कारवाई केली जाते का, तसेच राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.