Green Salute to Sudhir Mungantiwar: Trees Planted Across Maharashtra : हरित उत्सव: माजी वनमंत्र्यांच्या कार्याला वृक्षलागवडीने केला सलाम
Chandrapur : माजी वनमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, उमरी, धर्माबाद, सोनपेठ, नायगाव, बेटमोगरा, कवठा, देगलूर, हिंगोली, लातूर शहर, जळकोट राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.हा उपक्रम केवळ एक सण किंवा औपचारिक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक उद्देशाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रेरित होऊन राबवण्यात आला. आपले लाडके नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यप्रेरणेला अभिवादन करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संस्थांनी या वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सुधीर मुनगंटीवार हे केवळ राजकारणी नेते नसून निसर्ग संवर्धनाची वैचारिक मशाल बनले आहेत. वनमंत्री म्हणून त्यांनी 2016 ते 2019 या कालावधीत ‘वन महोत्सव’ आणि ’13 कोटी वृक्षलागवड अभियान’ यांसारखे ऐतिहासिक उपक्रम राबवत महाराष्ट्रात हरितक्रांती घडवली. केवळ सरकारी योजना म्हणून न पाहता त्यांनी वृक्षलागवड ही एक सामाजिक चळवळ बनवली आणि या चळवळीत समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली 50 कोटींपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली आणि त्याची नोंद जगभरात झाली.
Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा
मुनगंटीवार यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा नारा त्यांनी फक्त घोषवाक्य म्हणून न वापरता, जनमानसाच्या मनामनात रुजवला. त्यांनी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वनविभाग आणि सामान्य नागरिकांना एकत्र आणत ही मोहीम व्यापक आणि प्रभावी बनवली. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात त्यांनी स्वतः हजारो झाडं लावून लोकांसमोर आदर्श ठेवला. विवाह, वाढदिवस, नामकरण, उत्सव अशा प्रत्येक क्षणाला वृक्षलागवडीशी जोडून त्यांनी या चळवळीला सामाजिक आणि भावनिक अधिष्ठान दिलं
Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !
या कार्याचा सकारात्मक परिणाम आयएसएफआर-2023 च्या अहवालात स्पष्टपणे दिसून येतो. वन सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण हरित क्षेत्र 65,383 चौ.कि.मी. पर्यंत पोहोचले असून, महाराष्ट्र देशातील हरित क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर आहे. ही वाढ ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेचेच फलित आहे. संयुक्त राष्ट्रांनी देखील या उपक्रमाची दखल घेतली असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशपातळीवर लोकसहभागातून राबवलेली सर्वात मोठी वृक्षलागवड ठरली आहे.
Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ
आज महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उभ्या असलेल्या लाखो झाडांमागे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दूरदृष्टी आणि पर्यावरणाबद्दलची बांधिलकी ही प्रेरणादायी स्मृती म्हणून उभी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबवण्यात आलेली वृक्षलागवड मोहीम केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नव्हे, तर हरित संस्कृतीच्या नवसर्जनाचा एक नवा अध्याय ठरली आहे.अशा संवेदनशील, पर्यावरणप्रेमी नेत्याप्रती आपले प्रेम व आदर व्यक्त करत राज्यभरातील कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण करून त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.