Breaking

Ministers threat : “कानाखाली मारीन, बडतर्फ करेल, चमचेगिरी करु नको”

Minister of State Meghna Bordikars angry video goes viral : राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा संतापाचा व्हिडिओ व्हायरल

Parbhani : राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सार्वजनिक कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची आणि बडतर्फ करण्याची धमकी दिली. यावरून आता जोरदार राजकीय वादंग उफाळले आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका सरकारी कार्यक्रमात बोर्डीकर यांनी घरकुल लाभार्थ्यांना कमी संख्येने आणल्याबद्दल एका ग्रामसेवकावर थेट व्यासपीठावरून संताप व्यक्त केला.”कानाखाली मारीन, पगार कोण देतो?, आताच बडतर्फ करेन, चमचेगिरी नको” असे शब्द त्यांच्याकडून वापरले गेले. “माझ्याकडे सर्व माहिती आहे, तू काय कारभार करतोस ते माहिती आहे. हमाली करायची असेल तर नोकरी सोड” असं म्हणत त्यांनी त्या कर्मचाऱ्याचा खरपूस समाचार घेतला.

Freestyle fight between sarpanch and member : सरपंच आणि सदस्यात फ्रीस्टाईल; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

 

या प्रकाराचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.”सरकारी कार्यक्रमात कर्मचारी वर्गाला कानाखाली मारण्याची धमकी देण्याचा अधिकार मंत्र्यांना कोण दिला?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “सभागृहात रम्मी खेळणारे, बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, भ्रष्टाचार करणाऱ्यांचा गौरव करणारे… आता यामध्ये भर पडली आहे ती थेट अधिकाऱ्यांना कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची!”
“फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधले आहेत तुम्ही! मंत्रिमंडळाची इज्जत जातेच, पण महाराष्ट्राचीही बेअब्रू होतेय.”असे त्यांनी म्हटले आहे.