Skill Development Center will be inaugurated by the Chief Minister himself : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यंत्रणांना केले अलर्ट
Amravati उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदगाव पेठ येथील एमआयडीसी परिसरातील कौशल्य विकास केंद्राला आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील यंत्रसामुग्री, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण व्यवस्थेची पाहणी केली. या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. परिसरातील उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण दिले जात असून, येथे अत्याधुनिक लॅबमुळे प्रशिक्षणार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळत आहे. तसेच प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभवही दिला जात आहे. या केंद्रासाठी स्थानिक उद्योजकांकडून आतापर्यंत 440 प्रशिक्षित कामगारांची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
Water crisis : नेते गप्प, योजना ठप्प; सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गावे कोरडीच!
मंत्री सामंत यांनी केंद्राच्या इमारतीच्या गुणवत्तेचे आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या उपलब्धतेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुढील 15 दिवसांत उद्घाटनाची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी आयटीआय, तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच उद्घाटन सोहळ्यात ‘माझी मराठी, अभिजात मराठी’ या नावाचा एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबई, सुरत आणि अहमदाबाद येथील टेक्सटाईल क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चासत्राचे आयोजन करण्याची सूचना सामंत यांनी केली.
Balwant Wankhede : यंत्रणा बिनधास्त असेल, तर कामांवर परिणाम होणारच
भेटीदरम्यान मंत्री सामंत यांनी केंद्रातील प्रशिक्षण कक्ष, उपकरणांची स्थिती आणि स्वच्छतेची पाहणी केली. इमारतीच्या गुणवत्तेबाबत आणि कामाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.








