Buldhana leads in industrial development, guardian minister claims : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांचा दावा, सर्वांगीण विकासाचा संकल्प
Buldhana प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८२९ नवीन उद्योगांना मान्यता मिळाली असून दोन हजार रोजगारनिर्मिती झाली आहे. “औद्योगिकीकरणाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा अव्वल ठरतोय. रोजगार निर्मितीत अमरावती विभागात पहिले आणि राज्यात चौथे स्थान मिळवले आहे,” असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या शर्यतीत अग्रस्थानी नेण्याचा संकल्प संकल्प केला आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि सामाजिक न्याय अशा सर्व क्षेत्रात गतीने प्रगती सुरू असल्याचे ते म्हणाले.
Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या गटांचा अंतिम आराखडा पाच दिवसांत?
पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबत असल्याचे नमूद केले. “राज्य सरकार कृषी, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देत असून बुलढाणा जिल्ह्यात या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे,” असे पाटील म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त ७ लाख शेतकऱ्यांना ७८० कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले असून खरीप हंगामात ४ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
जिल्ह्यात ‘सहज प्रणाली’द्वारे १ कोटी ५० लाख दस्तावेजांचे डिजिटायझेशन झाले असून वॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देणारा बुलढाणा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.








