Seperate Vidarbha State : विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान, विदर्भवाद्यांचा निर्धार

campaign to create awareness about Vidarbha state formation : शाळा-महाविद्यालयांमध्ये करणार जनजागृती, संकल्प मेळावा घेणार

Buldhana विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान बुलडाणा शासकीय विश्रामगृह येथे पार पडले. या अभियानाचे नेतृत्व समितीचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार अॅड. वामनराव चटप (चंद्रपूर) यांनी केले.

कार्यक्रमाला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रीमती रंजना मामर्डे (नागपूर), पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत (अमरावती), पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष अॅड. सुरेशराव वानखेडे (मेहकर), सौ. पद्मजा राजपूत (अमरावती) आदींसह जिल्हाध्यक्ष प्रा. राम बारोटे प्रमुख उपस्थित होते.

या अभियानात जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी प्रा. डॉ. वंदना काकडे यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा सादर करत आगामी नियोजन मांडले. तर प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी विदर्भ चळवळीची व्याप्ती समाजाच्या सर्व घटकांपर्यंत वाढविण्याची गरज अधोरेखित करत मार्गदर्शन केले.

Maharashtra politics : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू

चर्चेत जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकारिणीचे गठण, महिला आणि युवा संघटन बळकट करणे, नवीन सदस्य नोंदणी, शाळा-महाविद्यालयांशी संवाद, स्थानिक मुद्द्यांवर जनजागृती आदी विषयांचा समावेश होता. अॅड. सुरेश वानखेडे यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी घेऊन जनसंवाद अभियान राबविण्याचे आश्वासन दिले.

संस्थापक अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी विदर्भ राज्य निर्मितीसाठी सुरू असलेल्या चळवळीतील चढउतार, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आणि विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची गरज स्पष्ट केली. तसेच गोंदिया, चिखलदरा येथे झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करत आगामी वाशीम संकल्प मेळाव्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले.