ST income : रक्षाबंधनात एसटीची विक्रमी १३७.३७ कोटींची कमाई !

Minister Sarnaik appreciated the hard work of the employees : कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे मंत्री सरनाईक यांनी केले कौतुक

Mumbai : रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाला यंदा विक्रमी उत्पन्न मिळालं आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला असून, यात तब्बल ८८ लाख महिला प्रवासी होत्या. आठ ते अकरा ऑगस्ट या कालावधीत एसटीला एकूण १३७.३७ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

विशेष म्हणजे अकरा ऑगस्टला एका दिवसात तब्बल ३९.९ कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं. याशिवाय नऊ ऑगस्टला ३०.०६ कोटी, दहा ऑगस्टला ३४.८६ कोटी, तर बारावा ऑगस्टला ३३.३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवसापासून परतीच्या प्रवासापर्यंत एसटी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Pawer Vs pawer ; दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसू नये !

गेल्या वर्षी रक्षाबंधन काळात, म्हणजे १७ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान, एसटीला एकूण १२१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. त्यावेळी २० ऑगस्ट रोजी एका दिवसात ३५ कोटी रुपयांचा महसूल विक्रमी ठरला होता. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघत महसूल थेट १३७.३७ कोटींवर पोहोचला आहे.

Maharashtra Navnirman Sena : ‘लावा मराठी पाटी, नाहीतर मनसे घेईल गाठीभेटी’

या विक्रमी उत्पन्नामागे एसटी कर्मचाऱ्यांची मेहनत महत्त्वाची ठरल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं. घरी सण असूनही कर्तव्याला प्राधान्य देत प्रवाशांना सुविधा मिळाव्यात म्हणून कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवली. त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करत सरनाईक म्हणाले की, प्रवाशांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे एसटीने आपला विश्वासार्ह पर्याय असल्याचं सिद्ध केलं आहे.