Shabari Gharkul Yojana launched in Solapur and Dharashiv districts : सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये शबरी घरकुल योजनेची सुरूवात
Solapur / Dharashiv : छोटंसं का होईना, पण स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. आदिवासी पारधी समाजातील लोकांनीसुद्धा हे स्वप्न पाहिलं होतं. पण आजवर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले नाही. पण महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम आणि आदिवासी पारधी कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच आदिवासी पारधी समाजासाठी सोलापूर आणि धाराशीव जिल्यांमध्ये शबरी घरकुल योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक बेघर आदिवासी कुटुंबांना पक्की घरे मिळणार आहेत. त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशस्वी उपक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी ननावरे तसेच आदिवासी सेवक बबन गोरामन, अनिल पवार, अतिश पवार आणि रमेश शिंदे यांचे विशेष योगदान आहे.
Chandrashekhar Bawankule : केव्हा होणार महानगरपालिका निवडणुका? बावनकुळेंनी सांगूनच टाकले..
घरकुलांबरोबरच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. वैयक्तिक व्यवसायांसाठी किराणा दुकान, रसवंती, पिठाची गिरणी, चहा टपरी, वडापाव सेंटर यासारख्या योजनांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच, सामुदायिक व्यवसायांसाठी ढाबा, आर.ओ. प्लांट, मसाला व्यवसाय, कडक भाकरी व्यवसाय यांसाठी पाच लाखांपर्यंत निधी उपलब्ध आहे. या योजनांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे.
मिशन आरंभ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ७० टक्के आदिवासी पारधी कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज जोडणी, गॅस कनेक्शन किंवा शौचालयासारख्या मूलभूत सुविधा नसल्याचे समोर आले. यासाठी आदिवासी पारधी समाजाच्या बेडे पाड्यावर शिबिरांचे आयोजन करून या सुविधा पुरवण्याचे काम जोमाने सुरू आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर क्षेत्रातील आदिवासी पारधी बांधवांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधवांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर या कार्यालयातून पारधी समाजाला एकही योजना मिळत नसल्याच्या आरोप पारधी न्याय संकल्प परिषदेत पारधी समाजाचे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ता रमेश शिंदे आणि आदिवासी सेवक बबन गोरामन यांनी आयोगासमोर केला होता. त्यानंतर हे काम सुरू झाले.
अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या आदेशानुसार सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधवांसाठी बेड्या पाड्यांवर गावागावांत राजस्व समाधान शिबिरे आयोजित केली जाणार असून पारधी समाजाच्या गरजू कुटुंबांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली महसूल प्रमाणपत्र आदी कागदोपत्री तयार करण्यात येणार आहे. त्यांच्या समर्पित कार्यामुळे अनेक पारधी कुटुंबांना हक्काचे घर आणि आर्थिक सक्षमता मिळाली आहे.
Three new police stations : नागपूर जिल्ह्यात तीन नवे पोलिस स्टेशन्स होणार !
आदिवासी विकास विभागाने २०११-१२ पासून पारधी विकास कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. परंतु आदिवासी पारधी समाजाच्या लोकांपर्यंत आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या योजनांपासून पारधी समाज कोसो दूर होता. पण ही योजना आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.