Nitin Raut : काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत यांचा फडणवीसांना पाठिंबा !

letter regarding ‘Dream Project’ has created stir in political circles ; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ संदर्भातील पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

Nagpur ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री आणि विदर्भातील दिग्गज नेते नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला थेट पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचा मोठा गट या प्रकल्पाच्या विरोधात असताना राऊत यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला दुजोरा दिला. आपल्या पत्रात त्यांनी दिल्ली नागपूर, हैदराबाद कॉरिडॉर, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ विदर्भ गोवा महामार्ग यांचे एकत्रीकरण करून सुवर्ण त्रिकोण उभारण्याची मागणी केली आहे. या महामार्ग त्रिकोणामुळे विदर्भाला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याची संधी मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Prakash Ambedkar : अन्याय खरंच दूर करायचा आहे की केवळ दिखावा आहे?

दरम्यान, काँग्रेसमधील अनेक नेते शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमिनींचे अधिग्रहण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी त्यांची भीती आहे. परंतु राऊत यांनी मात्र विकासाला प्राधान्य देत प्रकल्पाला खुले समर्थन दिले आहे.

या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये मतभेद स्पष्ट झाले आहेत. पक्षातील अनेक नेते एकमुखाने विरोध करत असताना विदर्भातील प्रभावी नेते राऊत यांनी उघड पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dnyanesh Kumar : “तुमच्या आया-बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज देणं योग्य आहे का?” – निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यावर संताप

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले नितीन राऊत हे काँग्रेसचे विदर्भातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या या भूमिकेला स्थानिक राजकारणाबरोबरच काँग्रेसच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.