Gadkari helped in my Emergency : त्यांची सभा झाली आणि लोकसभा निवडणूक जिंकले
Nagpur लोकसभा निवडणुकीत मला माझा पराभव दिसत होता. मतदानाचा दिवस जवळ येत होता. मला टेंशन आलं. अनेक सभा झाल्या, रॅली झाल्या. पण तरीही विजयी होऊ की नाही, याबाबत शंका होती. अशा ‘आणीबाणी’च्या परिस्थितीत नितीन गडकरी माझ्यासाठी धावून आले. त्यांच्या सभेमुळे माझा विजय झाला, या शब्दांत खासदार कंगना रनौत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अभिनेत्री खासदार कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे प्रिमियर नागपुरात आयोजित करण्यात आले. नितीन गडकरी आणि अभिनेते पद्मश्री अनुपम खेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रमियर झाला. यावेळी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणारेही जुने कार्यकर्ते उपस्थित होते. कंगना यांनी चित्रपटाच्या प्रमियरचे नागपुरात आयोजन होण्याची पार्श्वभूमी सांगितली.
Nagpur Police : तिचा ओरडण्याचा आवाज आला… लोकांना वाटले अपहरण !
‘मी हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. मंडी या माझ्या मतदारसंघात माझी स्थिती नाजूक होती. लोकांचं पाठबळ होतं, पण तरीही निवडणूक जिंकू शकणार की नाही, याबाबत साशंकता होती. अशावेळी मी नितीनजींना फोन केला. त्यांना माझ्यासाठी एक जाहीर सभा घेण्याची विनंती केली. गडकरींनी माझ्यासाठी सभा घेतली आणि निवडणुकीत माझा विजय शक्य झाला,’ असं कंगना म्हणाल्या.
‘इमर्जन्सी’ चित्रपट तयार झाल्यावर सेन्सॉर बोर्डापुढे गेला. सेन्सॉरने वारंवार दृष्य बदलायला लावले. त्यानंतरही सहा महिने संघर्ष करावा लागला. एवढा सगळा सोपस्कार झाल्यानंतर आता १७ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण लोक प्रतिसाद देतील का याची भीती होती. मला संकट आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे मी पुन्हा एकदा नितीनजींना फोन केला. नागपुरात प्रिमियर करण्याची विनंती केली आणि आजचा योग घडून आला,’ असं त्या म्हणाल्या.
Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?
संघभूमित प्रिमियर घेण्याची इच्छा
‘संघभूमित चित्रपटाचं प्रिमियर व्हावं, अशी इच्छा होती. सर्वांत पहिले नितीनजींनी चित्रपट बघावा. म्हणजे देशभरात चित्रपटाला यश मिळेल, अशी त्यामागची भावना होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक प्रिमियरला यावेत अशीही माझी इच्छा होती. मी नितीनजी यांना विनंती केली. त्यांनी हे सारे घडवून आणले. नितीनजी असे मंत्री ज्यांना भेटून आपल्या कुटुंबातील व्यक्तीला भेटल्यासारखे वाटते. आजही मी त्यांना आवाज दिला आणि ते धावून आले,’ असं कंगना म्हणाल्या.