Activists aggressive. clash broke out between Pandit and hake : कार्यकर्ते आक्रमक आ. पंडित विरुद्ध हाके संघर्ष पेटला
Beed : गेवराई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष उफाळला आहे. गेवराई शहरात सलग दुसऱ्या दिवशी पंडित समर्थक आक्रमक दिसून आले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा पंडित समर्थकांनी निषेध केला. छत्रपती संभाजी महाराज चौकात हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आंदोलकांनी दंडुके मारून पुतळ्याला आग लावली आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर आता पंडितांनी यावर प्रतिक्रिया देत लक्ष्मण हाके यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?
आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, “लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही. हा अदखलपात्र माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, कारण हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. आमच्या मतदारसंघात लोकांनी या हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. त्याने 2024 च्या निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला, पण माझ्या विरोधातील उमेदवाराचा डिपॉझिट जप्त झाला. हा दलाल श्वान आहे, स्ट्रीट डॉग आहे, रिचार्जवाला डॉग आहे. मंत्रालयात दलाली करणारा हा प्रीपेड श्वान आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.”
Local body election : मतदारसंघ रचनेस आव्हान देता येणार नाही !
यावरून लक्ष्मण हाके यांनीही पलटवार करत अजित पवार गटावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, “अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना आतून पाठिंबा आहे. अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार जरांगेंच्या व्यासपीठावर जातात, मांडीला मांडी लावून बसतात, हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का? मराठा आरक्षणाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. माझ्या पुतळ्यांचे दहन केलं जात आहे, पण मी स्वतः गेवराईला जाणार आहे. माझं खुले आव्हान आहे बघतो कोण मला अडवतो.”
दरम्यान, गेवराईत पंडित समर्थकांनी पुतळ्याचे दहन केल्यानंतर हाके समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून प्रतिउत्तर दिलं. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून पंडित विरुद्ध हाके संघर्ष चिघळला आहे.
____