Uddhav Vs. Shinde Shiv Sena : बुलढाणा मतदार संघातील चुरशीची निवडणूक न्यायालयात

Buldhana constituency election in court : उद्धव गटाच्या नेत्यांची फेरमोजणीची मागणी, शिंदे गटाचे आव्हान

Buldhana बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा वाद पुन्हा पेटला आहे. गेल्या वर्षी झालेल्या चुरशीच्या लढतीत केवळ 841 मतांनी पराभव झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करून फेरमोजणीची मागणी केली आहे.

शेळके यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, मतदार यादीत 3,561 बोगस नावे, मृत व्यक्तींच्या नावावर मतदान, तसेच एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सर्व ईव्हीएम मशीन न्यायालयीन देखरेखीखाली पुन्हा मोजाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Mahatma Gandhi Tanta Mukti Yojana : तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून ग्रामसभेत गदारोळ; अध्यक्षपद प्रलंबित

फक्त एवढेच नाही तर मतदारयादी, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे विजयाचे प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी शेळके यांच्या याचिकेत आहे. त्यांच्या वतीने ऍड. आकाश मून यांनी युक्तिवाद केला.

Illegal liquor sale : अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा मोर्चा; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी ही याचिका फेटाळण्याकरिता दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डर 7, नियम 11 अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. मात्र शेळके यांनी गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन आणि निराधार असल्याचे सांगत, न्यायालयाने याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय द्यावा, अशी मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत गायकवाड यांनी 91,660 मते, तर शेळके यांनी 90,819 मते मिळवली होती. केवळ 841 मतांच्या फरकाने गायकवाड विजयी झाले होते.

Sanjay Khodke Sulbha Khodke : रेल्वे ओव्हरब्रिज बंद; आमदार दाम्पत्य पोहोचले घटनास्थळी

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शेळके यांच्या याचिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाचा निर्णय फक्त बुलढाण्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरू शकतो.