EPFO’s new rule, big good news for early retirees : ईपीएफओ चा नवा नियम, लवकरदारांसाठी मोठी आनंदवार्ता
New Delhi : देशभरातील नोकरदारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ ने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून आता केवळ एक महिना नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा हक्क मिळणार आहे. यापूर्वी हा लाभ फक्त किमान सहा महिने काम केलेल्यांनाच मिळत होता.
नवीन बदलांनुसार, कर्मचारी केवळ एका महिन्यासाठी कामावर रुजू झाला तरी त्याचा समावेश कर्मचारी निवृत्तीवेतन योजना ईपीएस मध्ये होईल. अशा कर्मचाऱ्याला नोकरी सोडल्यानंतरसुद्धा पेन्शनचा हक्क मिळेल. यामुळे अल्पकालीन नोकरी करणाऱ्यांचे योगदान सुरक्षित राहणार आहे.
हा बदल विशेषतः बीपीओ, लॉजिस्टिक्स, कंत्राटी नोकऱ्या आणि अल्पकालीन क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी मोठा दिलासा आहे. या क्षेत्रात कर्मचारी अल्पावधीत नोकरी बदलतात. यामुळे पूर्वी त्यांची निवृत्तीवेतनाची रक्कम वाया जात असे. आता हा हक्क सुरक्षित राहणार असून भविष्यात त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
New controversy : ‘देवाभाऊ’ जाहिरातींवरून नवा वाद! रोहित पवारांचा गौप्यस्फोट !
पूर्वीच्या नियमानुसार, सहा महिन्यांपेक्षा कमी काळ काम केलेल्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नव्हती. म्हणजेच कमी कालावधीसाठी नोकरी करणाऱ्यांचे योगदान ईपीएस अंतर्गत नोंदवले जात नव्हते. त्यामुळे अल्पकालीन कर्मचाऱ्यांना मोठं नुकसान होत असे.
आपल्या ईपीएफ पासबुकमध्ये योगदान आणि ईपीएस अंतर्गत झालेली कपात तपासा. जर पासबुकमध्ये कपातीचा तपशील नसेल, तर तक्रार दाखल करता येईल. 2024 पासून ही तक्रार ईपीएफओ कडे ऑनलाइन करता येते. एक महिन्याच्या नोकरीनंतरही पासबुकवर ईपीएस कपात दिसू लागेल.
Amravati Municipal Corporation Elections : अमरावती महापालिका निवडणुकीत ‘फोडाफोडीचे राजकारण’?
या निर्णयामुळे तरुण आणि तात्पुरते कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अल्पकालीन नोकरी केल्यावरही त्यांचा निवृत्ती हक्क अबाधित राहणार आहे. भविष्यात ते पेन्शनसाठी पात्र होतील, यामुळे “प्रत्येक कर्मचाऱ्याचा निवृत्ती वेतनावर हक्क” हे सरकारचं आश्वासन अधिक मजबूत झालं आहे.
_____