The demand for ST reservation by the Banjara community is strong, : बंजारा समाजाची एसटी आरक्षणाची मागणी तीव्र,
Mumbai : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे आता बंजारा समाजातही नवा पेच निर्माण झाला आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख असल्याने समाजाकडून एसटी अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. सध्या बंजारा समाज व्हीजेएनटी ए प्रवर्गात आहे, मात्र गॅझेटचा आधार घेत त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबईत बंजारा समाजाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला धर्मगुरू, महंत, मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि समाजातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. समाजात या विषयावर मतांतरे असल्याने एकमताने भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होईल, अशी माहिती समोर आली आहे.
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन
हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गातील उल्लेख असून, “मराठ्यांना लाभ मिळू शकतो तर आम्हाला का नाही?” असा सवाल बंजारा समाजाकडून केला जात आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये बंजारा समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तशीच मागणी वेगाने पुढे येत आहे.
CM assurance : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तुम्ही मागणी करा, शक्य तेवढं देत जाऊ
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या बैठकीतूनही बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीला स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवला असून, ते हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले. बैठकीतून समाजाने इशारा दिला की, आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
मराठा समाजानंतर आता बंजारा समाजाकडूनही आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतला जात असल्याने सरकारच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
____