The role of seven office-bearers will be crucial in deciding the future of Akola Congressअकोला जिल्ह्यातील पक्षाची वाटचाल ठरविण्यात राहणार मोठी भूमिका
Akola काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने संघटनबांधणी आणि उमेदवारांच्या निवडीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हा आणि विधानसभा पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी प्रभारी पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. अकोल्यातील सात महत्त्वाच्या चेहऱ्यांची निवडणुकीतील भूमिका आणि कामगिरी काँग्रेसला कितपत फळ देणार, याकडे लक्ष लागले आहे.
प्रदेश काँग्रेसने नुकत्याच केलेल्या प्रभारी नियुक्त्यांनंतर १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रभारी डॉ. सुनील देशमुख, बाळापूर प्रभारी अनंत वानखेडे, अकोट-मूर्तिजापूर प्रभारी दिलीप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दौरे केले. संघटनातील अडचणी दूर करणे, जिल्हाध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांना दिशा देणे, तसेच सामाजिक समीकरणांचा अभ्यास करण्याचे काम या प्रभारींनी केले आहे.
Reservation issue : सरकार पावले टाकतंय पण त्याची योग्यता लवकरच कळेल !
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीममधील उपाध्यक्ष हिदायत पटेल, झिशान हुसेन, सरचिटणीस महेश गणगणे, सचिव अक्षय राऊत, प्रशांत पाचडे, आमदार साजिदखान पठाण आणि प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे या सात जणांची कसोटी या निवडणुकांत लागणार आहे. अकोट, बाळापूर आणि पश्चिम मतदारसंघात त्यांचा प्रभाव कितपत ठरणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
Local Self-Government Elections : नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकल्या असत्या, पण..!
महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचे संघटन कौशल्य, स्थानिक पातळीवरील पकड आणि प्रभावी नेत्यांशी जुळवून घेण्याची क्षमता काँग्रेसच्या यशासाठी निर्णायक ठरेल. यासोबतच इतर पक्षांतील नाराज गटांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवणे, हेही त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.








