Anil Bonde : खासदारांच्या तक्रारीनंतर जागे झाले पालिका प्रशासन

Financial exploitation of contractual employees in the Municipal Corporation : महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट; आयुक्तांची एजन्सीला ‘शो-कॉज’

Amravati महापालिकेतील बाह्यस्रोताद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी ‘मॅन पॉवर’मध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमबाह्यरीत्या जीएसटी, व्यवसाय कर, आयकर आणि कार्यालयीन खर्चाची कपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या प्रकरणी आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी संबंधित एजन्सींच्या संचालकांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावली आहे. २३ सप्टेंबर रोजी एका एजन्सीने प्रशासनाकडे खुलासा सादर केला असून उर्वरित दोन एजन्सींकडून उत्तरांची प्रतीक्षा आहे.

Zilla Parishad Election : वाढलेल्या मतदान केंद्रांचा फायदा कुणाला?

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन, महिनोन्‌महिने थकलेले पगार आणि त्यातून होणारी नियमबाह्य कपात या संदर्भात काही कर्मचाऱ्यांनी खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्रानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली. या तपासणीदरम्यान नियमबाह्य वेतनकपात व इतर अनेक गैरप्रकार समोर आल्याने प्रशासनही अवाक् झाले आहे.

“तिन्ही एजन्सींच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. एका एजन्सीने खुलासा पाठविला आहे. कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,” असं महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Heavy rainfall : पावसाने मारले सरकारने तारले; ५६६ कोटी मंजूर!

कंत्राटी ‘मॅन पॉवर’ पुरवणाऱ्या एजन्सी

गोविंदा कन्सल्टन्सी एजन्सी : ५६२ कर्मचारी (उच्चशिक्षित, संगणक ऑपरेटर)
महात्मा फुले एजन्सी : ४३ (अभियंता)
ईटकॉन्स प्रा. लि. : १८९ (उच्चशिक्षित कर्मचारी, शिक्षक, अतिक्रमण विभाग)