Prime Minister’s online interaction with the citizens of Bhendimahal : सौर कृषी वाहिनी प्रकल्पातील लाभार्थ्यांना मिळाली संधी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
Akola महाराष्ट्र राज्यातील 2,458 मेगावॉट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकरी तुषार वानखेडे यांच्याशी संवाद साधला. ते मुंबई येथे महावितरण मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरण व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा उपस्थित होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी अकोला जिल्ह्यातील शेतकरी तुषार वानखेडे यांच्याशी संवाद साधत भेंडीमहाल येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनि शेतीमध्ये साधलेली प्रगती याबाबत चर्चा केली.
भेंडीमहाल येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे 42 गावातील 1 हजार 680 शेतकऱ्यांना फायदा होत असून शेती सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध झाली आहे. भेंडीमहाल येथील कार्यक्रमाला सरपंच प्रदीप राठोड,मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, दशरथ राठोड,राजेश काकड, संकेत राठोड, महावितरणचे दीपक सोनाने,अजित दिनोरे गोरक्षनाथ सपकाळे ,कार्यकारी अभियाता पावडे,मेघा इंजिनिअरिंगचे जनरल मॅनेजर सत्यराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !
शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. कार्यक्रमांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचा महावितरणच्या वतीने सन्मान करण्यात आला.