Allegation of throwing wood at the agriculture officer : पदाधिकाऱ्यांविरुद्ध दंग्याचा गुन्हा, अधिकाऱ्यांना इजा केल्याची तक्रार
Amravati जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी दंगल आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे गंभीर गुन्हे नोंदविले. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी अधिकृत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, सातपुते आपल्या कार्यालयात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पराग गुडधे व त्यांचे कार्यकर्ते कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कार्यालयात दाखल झाले. जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा, शासनाची बंद पडलेली एक रुपयात पीकविमा योजना तात्काळ सुरू करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्या, या मागण्यांसाठी त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
Demand loan waiver : शेतकरी उद्ध्वस्त; पीएम केअर फंडातून कर्जमाफीची मागणी !
आंदोलनादरम्यान “महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, फडणवीस सरकारचा निषेध असो, कृषिमंत्र्यांचा निषेध असो” अशा घोषणा देण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली तसेच शिवीगाळ केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
Vijay Wadettiwar : अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्याला नाचायचं सुचतंच कसं ?
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की आंदोलकांनी सोयाबीन, कपाशी व उडीद पिकांची मुळांसकट सडकी झाडे टेबलावर तसेच आपल्या अंगावर फेकली. याशिवाय बाटलीतील पाणी टेबलावर आणि अंगावर टाकण्यात आले. हा प्रकार वारंवार घडवून आणून आपल्याला इजा करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप सातपुते यांनी केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.








