MLA Bapusaheb Pathare beaten up; Rohit Pawar furious : आमदार बापूसाहेब पठारेंना मारहाण; रोहित पवारांचा संताप
Pune : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना पुण्यातील लोहगावमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या या प्रकारानंतर वडगावशेरी मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पठारे हे एका स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. या हाणामारीदरम्यान आमदार पठारे यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत या प्रकाराचा निषेध नोंदवला.
Amit Shah : अमित शाह यांची शिर्डीत फडणवीस, शिंदे अजितदादा सोबत मध्यरात्री गुप्त बैठक !
4 “पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध! लोकप्रतिनिधीला धक्काबुक्की होत असेल तर तिथं सामान्य माणसाचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.”
या घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चौकशी सुरु आहे.
Electricity tariff hike : दिवाळीच्या तोंडावर वीजदरवाढीचा ‘शॉक’!
लोहगाव परिसरातील या हाणामारीच्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आल्याचं राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय दृष्ट्या अधिक संवेदनशील ठरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
_____