One Lakh Farmers in the District to Miss Out on PM-Kisan Benefits : ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी अनिवार्य, अन्यथा योजनांचा लाभ अशक्य
Buldhana ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यात येत आहेत. फार्मर आयडी नसल्यास शासकिय योजनांचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. फार्मर आयडी न काढल्यास पीएम किसानचा लाभ घेणारे जिल्ह्यातील एक लाख एक हजार ८६७ शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत.
शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी प्रकल्पाची अमंलबजावणी जिल्हयात दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासून कॅम्प मोडमध्ये तसेच दिनांक २१ जानेवारी २०२५ पासुन नागरी सुविधा केंद्र आणि कॅम्प या हायब्रिड मोडव्दारे करण्यात आली आहे. सदर मोहिम अंतर्गत जिल्हयात १४ ऑक्टोबर २०२५ अखेर चार लाख ५६ हजार ८१० शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहेत.
Local Body Elections : जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणाने उलथापालथ; अनेक दिग्गजांवर गट बदलण्याची वेळ
जिल्ह्यात पी.एम. किसान योजनेचे एकूण चार लाख ३४ हजार ४६८ लाभार्थी आहेत त्यापैकी आज अखेर ३ लाख ३२ हजार ६०१ लाभार्थ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहे. तरी उर्वरित एक लाख १ हजार ८६७ शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घ्यावे, अन्यथा आपल्याला पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.








