Give Immediate Jobs to 103 Project-Affected Families Sudhir Munghantiwar’s Firm Order : कोळसा चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही सुचवले उपाय
Chandrapur : शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेताना स्थायी नोकऱ्या देण्याचे लेखी आश्वासन विदर्भ मिनरल्स अॅंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिले होते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात नोकऱ्या देणे ही कंपनीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. कंपनीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नाही. कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ स्थायी नोकऱ्या द्याव्या, असे निर्देश राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे संबंधित कामगारांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आता कंपनीला तात्काळ नोकऱ्या द्याव्याच लागतील. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, सहाय्य कामगार आयुक्त प्रवीण कावळे, सहकारी कामगार अधिकारी खंडाईत, कंपनीचे प्रतिनिधी मनोज अग्रवाल, प्रकल्पग्रस्त कामगार आणि शेतकरी उपस्थित होते.
NCP Sharad Pawar : बुलढाण्यात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याने खळबळ
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत माझी भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे. शेतकऱ्यांनी उद्योग उभारणीसाठी आपली जमीन दिली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना रोजगार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. हा प्रश्न केवळ रोजगाराचा नसून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा आहे. प्रशासन आणि कंपनी यांनी या विषयात जबाबदारीची भूमिका घेतल्यास निश्चितच न्याय मिळू शकतो. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी माझी ठाम भूमिका आहे. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,असे आ.मुनगंटीवार म्हणाले.
Fake birth certificate : मलकापुरात ७१७ बोगस जन्मदाखले कायमस्वरूपी रद्द!
कामगार कायद्यातील त्रुटी दूर करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगारात प्रथम प्राधान्य दिले जावे. आवश्यक असल्यास कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाईल, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले. कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठीही आमदार मुनगंटीवार यांनी सूचना केल्या. ते म्हणाले,जिल्हाधिकाऱ्यांनी कोल वॉशरीजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. वाहूतक वाहनांचे चित्रीकरण करावे आणि सर्व कंपन्यांना प्रदूषण परवानग्या तपासाव्या.