MLA Kardile passes away : आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

District in mourning, tributes from all parties : जिल्ह्यावर शोककळा, सर्वपक्षीयांची श्रद्धांजली

Rahuri : आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली होती. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

शिवाजीराव कर्डिले हे 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे समजते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, समर्थक आणि मतदारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या मतदारसंघासाठी ते नेहमी सक्रिय राहिले. राहुरी मतदारसंघात त्यांचे एकहाती प्रभुत्व होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामांना गती दिली होती.

Local Body Elections : महाविकास आघाडीची रणनिती ठरली; स्थानिक निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय

शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दुधाच्या व्यवसायातून केली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदारपद मिळवले. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेवटी भाजप असा राहिला. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या सरळ आणि जमिनीवर राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्व पक्षांमध्ये लोकप्रिय होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे त्यांच्या जावई आहेत. कर्डिले यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली. नगर जिल्ह्यातील नागरिकांनी रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Local Body Elections : दहा गटांतील मतदार ठरवणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह नगर जिल्हा अनाथ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.